चिमुकले पाऊले चालती पंढरीची वाट यशश्री विद्यालयामध्ये चिमुकल्यांचा पायी दिंडी सोहळा

 माय अहमदनगर वेब टीम



 नगर तालुका- विठुराया अन् आषाढी एकादशीचे महत्व शाळेतील चिमुकल्यांनाही समजावे या उद्देशाने धनगरवाडी येथील यशश्री  विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक दिंडी, रिंगण सोहळा, फुगडी असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठू नामाचा जयघोष करत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

       ज्ञयशश्री विद्यालयाच्या पटांगणात ज्ञानोबा माऊली च्या गजरात दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला होता. सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. विविध अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता.



       मुख्याध्यापक सिरील पंडित, उपमुख्याध्यापिका आरुषा कोल्हटकर, क्रीडा प्रशिक्षक राजू पवार  यांनी दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. चिमुकल्यांसोबत शिक्षक वृंदांनी फेर धरून, फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थी भगवा झेंडा, टाळ मृदुंग हाती घेऊन सहभागी झाले होते. विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठू नामाचा जयघोष करत होत्या.

       सोहळ्याचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. वनिता शिंदे यांनी केले. तर आभार सौ. मेघा शेटे यांनी मानले सर्व शिक्षक वृंद, शाळेतील सेविका यावेळी उपस्थित होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post