माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील प्रसिद्ध किराणा व्यापारी जगन्नाथ बाबुराव गायकवाड (वय ७५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
जेऊर येथे गेल्या अनेक वर्षांपासून ते किराणा दुकानाचा व्यापार करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा, दोन मुली, सून, पुतणे असा परिवार आहे. संतोष गायकवाड यांचे ते वडील तर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नामदेव गायकवाड यांचे ते चुलते होते. त्यांच्या निधनाने जेऊर पंचक्रोशी तसेच व्यापारी वर्गांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Post a Comment