माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- आजच्या युगात तरुणांनी वाचनाची सवय अंगीकारणे गरजेचे आहे. वाचनाच्या सवयीमुळेच आपली स्वप्न पूर्ण होत असतात. त्यामुळे सर्वांनी वाचनाकडे लक्ष देण्याचे आवाहन सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी केले.
जेऊर येथे मुक्ता साळवे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन सचिन बगाडे यांच्या हस्ते सुरेश बनसोडे, रामेश्वर निमसे, भारत वाघमारे, धनंजय साठे या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना बगाडे यांनी सांगितले की, आजच्या तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा वाचनाचे व्यसन अंगिकारावे.वाचनातून स्पर्धा परीक्षा देऊन आपली स्वप्ने सत्यात उतरावीत. गावोगावी वाचनालय उभारण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे बगाडे यांनी सांगितले.
आण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रणव वाघमारे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जेऊर येथे सार्वजनिक वाचनालय सुरू केल्याची माहिती दिली. तसेच गावातील तरुणांनी वाचनालयाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रणव वाघमारे यांनी केले. यापुढे प्रतिष्ठानच्या वतीने गावामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी उपाध्यक्ष आकाश वाघमारे, बापू वाघमारे, सुनील वाघमारे, संदीप वाघमारे, सचिन उमाप, वैभव मोहिते, संदीप मुरलीधर वाघमारे, विकी वाघमारे, संतोष वैरागर, मयूर वाघमारे, दीपक वाघमारे, उमेश वाघमारे, विकास वाघमारे, प्रमोद वाघमारे यांच्यासह अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद वाघमारे यांनी केले.
Post a Comment