माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील पोलीस व वनमित्र पथकाच्या वतीने ' ग्रीन अँड क्लीन गर्भगिरी' उपक्रमास चापेवाडीच्या माळरानावर वृक्ष लागवड करून सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत रोझरी माता चर्च परिसरात मैत्री दिनाच्या औचित्यावर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना संजय जाधव यांनी सांगितले की, वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच कमी पर्जन्यमानावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडी शिवाय पर्याय नाही. फक्त फोटोसेशन करता वृक्ष लागवड न करता झाडांचे संवर्धन देखील गरजेचे आहे. पोलीस व वनमित्र पथकाने ' ग्रीन अँड क्लीन गर्भगिरी' हा चांगला उपक्रम हाती घेतला असून जास्तीत जास्त तरुणांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जाधव यांनी केले.
रोझरी माता चर्च परिसरात जांभूळ, चिंच, कडुलिंब, बहावा,करंज अशा विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वृक्षांना संरक्षणासाठी जाळी देखील बनविण्यात आली आहे. त्यामुळे लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन होणार आहे. वनविभागाच्या वतीने वनरक्षक मनेष जाधव यांनी झाडे उपलब्ध करून दिली. मैत्री दिनानिमित्त वृक्ष लागवड करून वृक्षांबरोबर मैत्री करण्याचा संदेश यावेळी तरुणांकडून देण्यात आला.
याप्रसंगी संजय जाधव, रोहन पाटोळे, मायकल पाटोळे, किरण पाटोळे, प्रसाद पाटोळे, दिपक पाटोळे, सुरेश पाटोळे, गौरव गोतीस, बाळासाहेब पाटोळे, सनी गायकवाड, वैभव पाटोळे यांच्या सह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
______________________
ग्रीन अँड क्लीन गर्भगिरी उपक्रमात सहभागी व्हा
पोलीस व वनमित्र पथकाच्या वतीने तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ग्रिन अँड क्लीन गर्भगिरी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.
....... मायकल पाटोळे ( सदस्य पोलीस व वनमित्र पथक)
_____________________
Post a Comment