गावात ताकद कोणाची? 6 नोव्हेंबरला फैसला

 


जिल्ह्यातील 194 गावातील वातावरण तापले, 5 नोव्हेंबरला मतदान 

माय नगर वेब टीम

अहमदनगर - ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा पुढील महिन्यात उडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा मंगळवारी सायंकाळी केली. यात ग्रामपंचायत सदस्यपदांच्या, तसेच सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आणि मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.


राज्यभरातील सुमारे 2 हजार 369 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदांच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी, तर नगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसह 82 ठिकाणी पोट निवडणुकीसाठी पुढील महिन्यात 5 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात काल (मंगळवार दि.3) पासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येणार आहेत. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर रोजी होणार असून नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होवून निकाल घोषित होणार आहे.


ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असल्याने या ठिकाणी मतदार राजाची दिवाळी गोड होणार आहे. निवडणूका होणार्‍या गावात कोण विजयाचा गुलाल घेत आनंदाचे फटाके फोडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. निवडणूका होणार्‍या सर्वाधिक ग्रामपंचायती या अकोले तालुक्यातील 28 असून त्याखालोखाल शेवगाव तालुक्यातील 27, राहुरी तालुक्यातील 22 आहेत. सर्वात कमी ग्रामपंचायती जामखेड तालुक्यातील 3 आणि कर्जत तालुक्यातील 6 आहेत. जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत मुदत संपणार्‍या या ग्रामपंचायती आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या घोषणनंतर निवडणूक होणार्‍या गावात आचारसंहिता लागू झाली असून संबंधीत तालुक्याचे तहसीलदार यांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी राहणार असून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात

आली.

निवडणूक कार्यक्रम

* उमेदवारी अर्ज – 16 ते 20 ऑक्टोबर


* छाननी – 23 ऑक्टोबर


* माघारी मुदत – 25 ऑक्टोबर


* चिन्हांचे वाटप – 25 ऑक्टोबर


* मतदान – 5 नोव्हेंबर


* मतमोजणी – 6 नोव्हेंबर


तालुकानिहाय ग्रामपंचायत संख्या


अकोले 28, शेवगाव 27, राहुरी 22, कोपरगाव 17, श्रीरामपूर 17, नेवासा 16, पाथर्डी 15, राहाता 12, श्रीगोंदा 10, पारनेर 8, संगमनेर 7, नगर 7, कर्जत 6 आणि जामखेड 3 अशा 194 आहेत.


या गावात होणार निवडणूक


कोंभाळणे, पैठण, जहागिरदारवाडी, बारी, सांम्रद, रतनवाडी, मुतखेल, शिसवद, पाचनई, अंबित, पेंडशेत, वाजुळशेत, रेडे, सुगाव बु., गर्दणी, कौठवाडी, पिंपळगाव नाकविंदा, आंबेवगंन, देवगाव, एकदरे, कोकणवाडी, तिरडे, पाचपट्टावाडी, घोटी, पेढेवाडी, पिंपळदरावाडी, खानापूर-आगार (अकोले). गुंजाळवाडी, ढोलेवाडी, आश्वी खु, आश्वी बु., बोरबन, घारगाव, पिंपळगाव कोझिरा (संगमनेर). कुंभारी, घोयेगाव, ब्राम्हणगाव, वारी, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहीगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर, कान्हेगाव (कोपरगाव). दहेगाव कोर्‍हाळे, कोर्‍हाळे, निमगाव कोर्‍हाळे, धनगरवाडी, दुर्गापूर, वाकडी, दाढ बु., पिंपरी निर्मळ, कनकुरी, रुई, पुणतांबा-रस्तापूर, चितळी (राहाता).उक्कलगाव,उंदिरगाव, शिरसगाव,निमगाव खैरी, भोकर, फत्त्याबाद, खिर्डी, कान्हेगाव, गुजरवाडी, माळवाडगाव, दत्तनगर, भैरवनाथनगर, जाफ्राबाद, नाऊर, दिघी, रामपूर, कडीत बु. (श्रीरामपूर). कानडगाव, चिंचोली, पिंपरी वळण, निंभेरे, सडे, डिग्रस, शिलेगाव, दरडगावथडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, धामोरी खु., धामोरी बु., म्हैसगाव, देसवंडी, तमनर आखाडा, गंगापूर, बारागाव नांदूर, ब्राम्हणी, माहेगाव, मालुंजे खु., मुसळवाडी, टाकळीमियाँ (राहुरी). करजगाव, पानेगाव, देडगाव, पाचेगाव, फत्तेपूर, रस्तापूर, कौठा, शहापूर, पिचडगाव, भानसहिवरा, खुणेगाव, नागापूर, जैनपूर, सौंदळा, पानसवाडी, मुकींदपूर (नेवासा). हिंगणगावने, देवटाकळी, शहरटाकळी, बालमटाकळी, ढोरसडे अंत्रे, मुंगी, कर्‍हे टाकळी, खरडगाव, थाटे, बोधेगाव, वडुले खु., वरूर बु., भगूर, लोळेगाव, सामनगाव, एरंडगाव भागवत, लाखेफळ, एरंडगाव समसुद, वडुले बु., खडके, मडके, लाडजळगाव, आव्हाणे बु., बर्‍हाणपूर, दिवटे, शेकटे खु, गोळेगाव (शेवगाव). ढवळेवाडी, सैदापूर, हत्राळ, डमाळवाडी, जवखेड खालासा कासारवाडी, धारवाडी, गितेवाडी, पाडळी, दगडवाडी, डांगेवाडी, साकेगाव, रेणुकाई वाडी, डोंगरवाडी, चिचोंडी, करंजी (पाथर्डी). मुंजेवाडी, मतेवाडी, जवळा (जामखेड). कुंभेफळ, वायसेवाडी, खेड, गणेशवाडी, औटेवाडी, करमनवाडी (कर्जत). विसापूर, अधोरेवाडी, पेडगाव, आनंदवाडी, कोळगाव, देवदैठण, मढेवडगाव, टाकळी लोणार, लोणी व्यंकनाथ, घुटेवाडी (श्रीगोंदा). विरवली, यादव वाडी, मावळेवाडी, काकनेवाडी, वाडेगव्हाण, कान्हूरपठार, जामगाव, निंबोडी (पारनेर). बारदरी, मेहेकरी, हिवरेझरे, आरणगाव, देऊळगाव सिध्दी, हिंगणगाव, वडगाव गुप्ता (नगर).

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post