मैदानी खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते- प्राचार्या पवार यशश्री प्री स्कूलमध्ये क्रिडा महोत्सव ; विविध स्पर्धांचे आयोजन

  माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका-  नगर तालुक्यातील जेऊर येथील यशश्री प्री स्कूलमध्ये क्रिडा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शुक्रवार दि. १५ ते गुरुवार दि. २१  दरम्यान विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.



         क्रिडा महोत्सवाचे आयोजन यशश्री अकादमीच्या संचालिका सौ. अनुरीता शर्मा, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार, प्राचार्या सौ.मनीषा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी बोलताना सौ. मनीषा पवार यांनी सांगितले की, खेळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. बाल वयातच मुलांना खेळाची माहिती तसेच गोडी लागणे गरजेचे आहे.



         खेळामुळे मुलांचे आरोग्य सुदृढ राहते. मुले मोबाईल मध्ये गुरफटत चालली आहेत. ही बाब मुलांच्या आरोग्यासाठी तसेच भविष्यासाठी धोकादायक  आहे.  मुले पारंपारिक मैदानी खेळ सोडून मोबाईल मध्ये गुरफटत असल्याची खंत सौ. पवार यांनी व्यक्त केली. मैदानी खेळामुळे मुले तंदुरुस्त राहतात. त्यामुळे पालकांनी देखील मुलांना मैदानी खेळाकडे वळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुलांना बालवायातच मैदानी खेळाचे महत्व समजावे यासाठीच क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सौ. पवार यांनी दिली.



        क्रिडा महोत्सवा अंतर्गत धावणे, लिंबू चमचा, बुक बॅलन्स, बास्केट बॉल, बॉटल गेम, बॉल फेकणे व इतर खेळांच्या स्पर्धा पार पडणार आहेत. महोत्सव यशस्वी होण्यासाठी नलिनी खंडागळे, दीपा पवार, वेदिका मगर, पूजा पवार, मिनाक्षी भांड या शिक्षिका परिश्रम घेत आहेत.



______________

 यशश्री स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळ, सण, उत्सव, महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी मोठ्या उत्साहात   साज-या करण्यात येतात. त्यामुळे मुलांचे आरोग्य सुदृढ राहत असून एकी व समानतेची भावना निर्माण होते.

..... अनुरीता शर्मा ( संचालिका , यशश्री अकॅडमी )

___________

यशश्री प्री स्कूल जेऊर येथे विद्यार्थ्यांचा अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिल्याने शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.

....... राजेंद्र पवार ( क्रिडा मार्गदर्शक )

_________________

प्रवेशास सुरुवात

* अनुभवी शिक्षक * विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष  * सुसज्ज क्लास रूम  * प्रशस्त मैदान *  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम * मर्यादित प्रवेश * यशाची यशस्वी परंपरा * उत्तम व्यवस्थापन *

यशश्री जेऊर प्री स्कूल जेऊर मध्ये प्रवेशात सुरुवात झाली असून आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी  प्रवेश निश्चित करा !

संपर्क - सौ मनिषा पवार ( प्राचार्य ) मो.  7020897049

=================================================

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post