यशश्री प्री स्कूल जेऊर मध्ये बक्षीस वितरण समारंभ संपन्न क्रीडा महोत्सव सप्ताहाची सांगता ; व्यवस्थापनाचे कौतुक

  माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-  नगर तालुक्यातील यशश्री  प्री स्कूल जेऊर येथे आयोजित क्रीडा महोत्सव सप्ताहाची उत्साहात सांगता करण्यात आली. क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने उपस्थितांनी शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले.

        यशश्री प्री स्कूल जेऊर येथे १५  डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त धावणे, बॉल फेकणे, बास्केटबॉल, लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा पार पडल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

      क्रिडा सप्ताहाची सांगता, बक्षीस वितरण अन् ख्रिसमस अशा संयुक्त सोहळ्याचे आयोजन डॉ. दिपाली वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धांचे आयोजन यशश्री अकादमीच्या संचालिका अनुरीता शर्मा, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार, प्राचार्या सौ. मनीषा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेत महोत्सवाची शोभा वाढवली.

       डॉ. दिपाली वाबळे यांनी बोलताना सांगितले की, यशश्री प्री स्कूल जेऊर ने  शिक्षण क्षेत्रात आपला वेगळाच ठसा निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम शाळेचे आगळे वेगळे वैशिष्ट्य ठरत आहे. आपल्या देशाच्या संस्कृतीचे जतन, सर्व सण, उत्सव, मैदानी खेळ, महामानवांप्रती आदर निर्माण व्हावा यासाठी शाळेचे व्यवस्थापन नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिल्याने तसेच अनुभवी उच्चशिक्षित शिक्षकांमुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.


बालवयातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच एकी, समानतेची भावना जोपासण्यात व्यवस्थापन यशस्वी झाले आहे. ग्रामीण भागात निसर्गरम्य वातावरणात 'ग्रीन अँड क्लीन' स्कूल म्हणून यशश्री प्री स्कूल ने नाव कमावले आहे. सर्व सुविधांनी युक्त असलेल्या यशश्री स्कूलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांकडून देखील प्रयत्न होताना दिसून येतो. नगर तालुक्यात यशश्री स्कूलने शिक्षण क्षेत्रात आपला आगळा वेगळा ठसा निर्माण केला आहे. क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी शिक्षिका नलिनी खंडागळे, वेदिका मगर, दीपा पवार, पूजा पवार, मीनाक्षी भांड यांनी विशेष परिश्रम घेतले.

______________________

आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा !

प्रवेशास सुरुवात !

* अनुभवी शिक्षक * विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष  * सुसज्ज क्लास रूम  * प्रशस्त मैदान *  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम * मर्यादित प्रवेश * यशाची यशस्वी परंपरा * उत्तम व्यवस्थापन *

संपर्क - सौ मनिषा पवार ( प्राचार्य ) मो.  7020897049 / 9527553108 / 8999172233

____________________


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post