माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - हिवरे बाजार (ता. नगर) येथील एका शेतात गांजाचे झाडे मिळून आले आहेत. नगर तालुका पोलिसांनी सोमवारी (दि. 26) सायंकाळी ही कारवाई केली. पाच हजार रूपये किमतीचे दोन किलो 458 ग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार मंगेश खरमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साहेबराव मारूती ठाणगे (रा. हिवरे बाजार) याच्या विरोधात गुंगीकारण द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबराव ठाणगे याच्या शेतात गांजाची झाडे असल्याची माहिती सहा.पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने रविवारी सायंकाळी ठाणगे याच्या शेतात छापा टाकून कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग अधिक तपास करीत आहेत.
Post a Comment