नगरमधील डॉक्टरचा भयंकर प्रकार उघडकीस, क्लिनिकमध्येच घडला प्रकार



माय अहमदनगर वेब टीम

 अहमदनगर - उपचारासाठी क्लिनीकमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर (वय 17) डॉक्टरानेच वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील एका गावात रविवारी (दि. 11) दुपारी घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून डॉक्टर विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अंगद सदाशिव खाडे (रा. विळद ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. काल, सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस (14 फेब्रुवारीपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

डॉ. खाडे याचे नगर तालुक्यातील एका गावात क्लिनीक आहे. तो त्या क्लिनीक मध्ये येणार्‍या रूग्णांवर उपचार करत असतो. रविवारी दुपारी तो क्लिनीक मध्ये असताना अल्पवयीन मुलगी तेथे आली. त्याने तिच्यावर उपचार करण्याचा बहाणा करून इच्छेविरूध्द वारंवार अत्याचार केला. सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यांच्यासह पीडितीने सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पीडितीने यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलिसांनी डॉ. खाडे विरोधात अत्याचार, पोक्सो, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहा.पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक भोसले करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post