यशश्री प्री स्कूल जेऊर मधील चिमुकल्यांचा शिवजयंती सोहळा ठरला लक्षवेधी ! वर्षभर नवनवीन उपक्रम राबविणारी शाळा ; शिक्षणक्षेत्रात गरुडझेप

  माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-  तालुक्यातील यशश्री प्री स्कूल जेऊर मधील चिमुकल्यांनी साजरा केलेला शिवजयंती सोहळा लक्षवेधी ठरला. चिमुकल्यांनी केलेल्या आकर्षक वेशभूषा सोहळ्याचे विशेष आकर्षण होते.

      जेऊर येथील यशश्री प्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात. अभ्यासाबरोबर खेळ, महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी, सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करणाऱ्या यशश्री स्कूलने शिक्षणक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

         छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच विविध मावळ्यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या सौ. मनीषा पवार, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार यांच्या हस्ते सर्व  शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली.


     सर्व सण, उत्सव, महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात यशश्री प्री स्कूल नेहमीच अग्रस्थानी असते. विद्यार्थ्यांवर बालवयातच चांगले संस्कार व्हावेत तसेच इतिहासाची ओळख, महामानवांची माहिती, त्यांचे कार्य आपली संस्कृती याचे ज्ञान मिळावे यासाठी शाळा व्यवस्थापन नेहमीच पुढाकार घेताना दिसून येते.


विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर वैयक्तिक लक्ष, उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक, मुलांच्या आरोग्यासाठी विविध खेळ, प्रशस्त इमारत, ग्रीन अँड क्लीन शाळा, मर्यादित प्रवेश, मुलांच्या शैक्षणिक प्रगती बाबत पालकांची सातत्यपूर्ण संवाद, वर्षभर नवनवीन उपक्रम, हसत खेळत शिक्षण यामुळे परिसरातील चिमुकल्यांसह पालकांचाही कल यशश्री स्कूल कडे राहिलेला नेहमीच पाहायला मिळतो. यशश्री स्कूलच्या उत्तम व्यवस्थापनामुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे नगर, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी यशश्री स्कूलमध्ये येत आहेत.

_____________________________

नूतन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात !  आजच संपर्क साधा ! मर्यादित प्रवेश

संपर्क--

प्राचार्या सौ. मनिषा पवार :-  7020897049 / 8999172233 / 9527553108

_____________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post