शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, पहा काय आहे नवा अंदाज

 



माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई -वसंत ऋतूचे आगमन होताच देशातील हवामानातही बदल होऊ लागला आहे. काही राज्यांमध्ये प्रचंड थंडी, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसासह गारपीट होत आहे.

वसंत ऋतूचे आगमन होताच देशातील हवामानातही बदल होऊ लागला आहे. काही राज्यांमध्ये प्रचंड थंडी वाढली असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. पुढील काही दिवस हवामानाची अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये आता सूर्यप्रकाश मध्यम झाला असून आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि आसपासच्या परिसरातही हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस होईल. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

इतकेच नाही तर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये हलका पाऊस आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी (१३ फेब्रुवारी) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारच्या काही भागात हलक्या पावसाची नोंद झाली. पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, तटीय तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका पाऊस झाला. यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाला आहे.

महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. आधीच अवकाळीमुळे विदर्भातील शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यातच हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post