माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर - दौंड रोड असलेल्या नगर- बीड रेल्वे मार्गाच्या क्रॉसिंग पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दि.२१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक कायनेटिक चौक ते केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी (दि.१२) दुपारी काढले आहेत.
या आदेशात त्यांनी म्हंटले आहे की, ज्याअर्थी, दि. १४ते दि. २१ फेब्रुवारी रोजी दरम्यान नगर ते दाँड जाणारे रस्त्यावर नगर- बीड रेल्वे लाईनला ओलांडणी पुलाचे बांधकाम सुरु होत आहे. सदर बांधकामासाठी साईटच्या जवळ मोठमोठे गर्डर वर्णावण्यात आलेले आहेत. सदर गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत. नमुद रोड हा रहदारीचा असल्याने अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. दि. १४ रोजीचे सकाळी ८ ते दि. २१ रोजीचे रात्री ८ वाजे पर्यंत नगर दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील येणारी व जाणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद राहणार आहे.
त्यामुळे कायनेटीक चौकातुन दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग - कायनेटीक चौक - केडगाव- केडगाव बायपास अरणगाव बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील. अरणगाव चौकातुन कायनेटीक चौकाकडे येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग - अरणगाव बायपास केडगाव बायपास केडगाव कायनेटीक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. पुणेकडुन दौंड रोडला जाण्यासाठी कायनेटीक चौकात येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग - केडगाव बायपास अरणगाव बायपास दौंड रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. असे या आदेशात म्हंटले आहे.
Post a Comment