पाणी पुरवठा... ; मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे आदेश



पाणी पुरवठा योजनेतील खंडित विद्युत जोडण्या तातडीने सुरू करा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर-  अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महसूलमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री यांनी अधिवेश काळात विधान भवनात तातडीची टंचाई आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेतील खंडित विद्युत जोडण्या तातडीने सुरू करून पाणी पुरवठा पुर्वावत करण्याचे आदेश दिले.  

या बैठकीत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा  खंडित झाल्यामुळे बाधीत झालेल्या विविध पाणी पुरवठा योजनांचा  आढावा घेण्यात आला. यावेळी महावितरण विभागाने महापालिका क्षेत्रातील वीज देयक प्रलंबित असल्यामुळे काही जोडण्या खंडीत करण्यात आल्या असल्याची तर ग्रामीण भागात जिल्हापरिषदेच्या थकित देयकामुळे वीज जोडण्या खंडित करण्यात आल्याची माहिती दिली. यामुळे  पाणी पुरवठ्याच्या योजना बाधित होत असल्याचे सांगितले.   

पालकमंत्री यांनी महापालिका आणि जिल्हापिरषदेला तातडीने महावितरण विभागाचे थकित देयके देण्याचे आदेश दिले. या संदर्भात तातडीने अहवाल शासनाकडे सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सांगितले. शासनाकडून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी पालकमत्र्यांनी दिले. त्याच बरोबर विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बंद झालेल्या पाणी पुरवठा योजनांची पाहणी करून बाधित झालेला पुरवठा तात्काळ पुर्वावत करून नागरिकांना दिलासा देण्याचे सांगितले. टंचाई काळात जिल्ह्यात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही असेही पालकमंत्री म्हणाले. 

सदर बैठकीला दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महापालिका आयुक्त पंकज जावळे, महावितरण नाशिकचे मुख्य अभियंता दीपक कुमटेकर उपस्थित होते. तर दालनात संजय पाटील मुख्य अभियंता प्रकाशगड महावितरण आणि इतर वरिष्ठ अधिकारी हजर होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post