नगरमध्ये कॅफेवर छापेमारी, अश्‍लिल चाळे करणाऱ्यांना पोलीसी खाक्या



माय अहमदनगर वेब टीम 

 अहमदनगर  - मुला-मुलींना अश्‍लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्‍या दिल्लीगेट, सिध्दीबाग परिसरातील तीन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी बुधवारी (दि. 14) व गुरूवारी (दि. 15) छापेमारी केली. पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या तीन वेगवेगळ्या फिर्यादीवरून कॅफे चालक आकाश पांडुरंग जाधव (वय 26 रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता), आदिराज विलास दोमल (वय 22 रा. वाघमळा, बालिकाश्रम रस्ता), मंगेश गोरख कोळगे (वय 23 रा. चास, अकोळनेर ता. नगर) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्ली गेट येथी युनिक स्टार कॅफे, सिध्दीबाग येथील ब्लक कॅफे तसेच दिल्लीगेट येथील स्पय बिल्डींगच्या पाठीमागे एका कॅफेत प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावून अंधार करून शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्‍लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक रणशेवरे यांनी पोलीस अंमलदार त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, वसीम पठाण, शिरीष तरटे, सुमित गवळी यांच्यासह सदर कॅफेंवर छापेमारी केली असता त्या ठिकाणी काही मुले-मुली अश्‍लिल चाळे करताना मिळून आले. त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले असून कॅफे चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post