नगरमध्ये गुरुवारपासून रंगणार कबड्डीचा थरार; एकाच वेळी होणार चार सामने



कबड्डीमॅटचे मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात /  ७० वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा :  ३० हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी :

माय अहमदनगर वेब टीम

 अहमदनगर -  येथे दि .२१ पासुन होणाऱ्या ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कबड्डीमॅटचे भव्य मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन एकाच वेळी चार सामने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत . सुमारे ३० हजार प्रेक्षक बसु शकतील अशी प्रेक्षा गॅलरी उभारण्यात आली आहे .

 नगरच्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा दिनांक २१ मार्च ते २४ मार्च या कालावधीत पार पडणार आहे.  या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील, कबड्डी प्रेमाचे लक्ष लागलेले आहे. नगरमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा होत असुन यात देशातील ३२ राज्याचे संघ सहभागी होणार आहेत .आज तीन राज्याचे संघ नगरमध्ये दाखल झाले असुन उर्वरीत संघ बुधवारी दुपारपर्यंत नगर शहरात दाखल होणार आहेत .

या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील मैदान तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे . मॅटचे चार मैदान तयार करण्यात आले असुन एकाचप्रेक्ष वेळी चार सामने होणार आहेत . रोज ३० सामने होणार आहे . प्रकाशझोतात सामने होणार असल्याने प्रेक्षकांची मोठी गर्दि होणार आहे . यामुळे जवळपास ३० हजार प्रेक्षक बसु शकतील अशी प्रेक्षा गॅलरी उभारली जात आहे .

आज महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक शांताराम जाधव ,व्यवस्थापक शंतनु पांडव, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा . शशिकांत गाडे , विजय मिस्कीन , प्रकाश बोरूडे , विनायक भुतकर , संतोष घोरपडे , अजय पवार , कृष्णा लांडे , सचिन सप्रे , संतोष गाडे यांनी मैदान उभारणीच्या कामाची पाहणी केली .


फोटो : नगरमधील वाडिया पार्क होत असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या मैदानाची पाहणी करताना अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू शांताराम जाधव , आयोजक प्रा . शशिकांत गाडे , व्यवस्थापक शंतनु पांडव 

   

 800 खेळाडू नगरमध्ये येणार 

  राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी नगर शहरावर आहे. देशभरातील ८०० खेळाडू नगरमध्ये येणार आहेत. वेगवेगळ्या प्रांतातून ३२ संघ नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांचे आदरातिथ्य आपल्याला करायचे आहे. राज्य स्तरीय स्पर्धा यशस्वी पणे आयोजन करण्याचा अनुभव आमच्याकडे आहे त्यामुळे मागीलवेळी राहिलेल्या सर्व त्रुटी भरून काढून उत्कृष्ठ पणे नियोजन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमी खेळाडु, तसेच कार्यर्कत्यांना आवाहन आहे की ज्यांना स्वयंस्फूर्तीने काम करण्याची इच्छा आहे त्यांनी जरून संघटनेकडे नाव नोंदवून समितीची जबाबदारी घ्यावी व ही स्पर्धा यशस्वी करण्यास मदत करावी .

- प्रा .शशिकांत गाडे ( उपाध्यक्ष , राज्य कबड्डी संघटना )

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post