नव नागापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी संतप्त / केला गंभीर आरोप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नव नागापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेेंद्रासाठी आ. नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या काळात मंजुरी आणलेली असताना खासदार सुजय विखे यांनी शुक्रवारी परस्पर त्याचे भुमिपुजन केल्याने नवनागापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले आहेत. खासदार दुसऱ्याच्या झेंंडयावर पंढरपूर करण्यासारखा हा प्रकार असल्याची बोचरी टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
नव नागापूर येथील आरोग्य उपकेंद्र महानगरपालिका हद्दीमध्ये गेल्याने हे केंद्र नव नागापूर येथे हलविण्यासाठी सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांनी आ. नीलेश लंके यांना साकडे घातले होते. आ. नीलेश लंके यांनी ५ जुलै २०२१ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन हे उपकेंद्र नव नागापूर येथे हलविण्याची मागणी करीत तसे निवेदनही सादर केले होते. त्यानंतर सरपंच बबनराव डोंगरे यांनी या प्रश्नासाठी वारंवार पाठपुरावा करीत तीनच महिन्यात या उपकेंद्रास मंजुरी मिळविण्यात यश मिळविले. दि. ७ऑक्टोबर २०२१ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव रोशनी कदम पाटील यांनी तसा शासन निर्णय देखील पारीत केला.
या आरोग्य उपकेंद्राची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर नवनागापूर ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी त्याचे भुमिपुजन करण्यात आले. असे असतानाही त्यापूर्वीच आरोग्य विभागाच्या वतीने घाईने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या उपकेंद्राच्या भुमिपुजनाची तयारी केली. व शुक्रवारी सायंकाळी उपकेंद्राचे भुमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरूवारी रात्री उशिरा आ. नीलेश लंके यांना पाठविली. आ. लंके यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम असताना त्यांना डावलून केवळ श्रेय घेण्यासाठी खासदारांनी भुमिपुजनाचा घाट घातला. प्रत्यक्ष या उपकेंद्रासाठी कोणाचा पाठपुरावा आहे ? शासन निर्णय कधी झाला आहे याची जाणीव नवनागापूरच्या ग्रामस्थांना असल्याचे सरपंच बबनराव डोंगरे, सदस्य मंगलताई गोरे, गोरक्षनाथ गदाणे, रंजनाताई दांगट, कल्पनाताई गिते तसेच ग्रामस्थ रोहिदास केदार, अक्षय पिसे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतने भूमिपूजन करूनही खासदारावर पुन्हा भूमिपूजनाची नामुष्की!
आमदार निलेश लंके यांनी या उपकेंद्रासाठी पाठपुरावा करून मंजुरी मिळवली. त्यामुळे या कामाचा शुभारंभ लंके समर्थक ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सदस्यांना असल्याने त्यांनी भूमिपूजन करून घेतले. दुसरीकडे खासदार यांचा या कामाशी काडीचाही संबंध नसताना केवळ श्रेय घेण्यासाठी पुन्हा भूमिपूजन करण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याची टीका पदाधिकाऱ्यांनी केली.
Post a Comment