माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपू नये अशी मागणी होत असतानाच आता थेट डॉक्टरांना देखील निवडणुकीच्या कामाला लावले जाणार आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावली जाणार आहे. यामुळे रुग्ण सेवेची जबाबदारी असणाऱ्या डॉक्टरांना आता निवडणुकीचे अतिरीक्त काम करावे लागणार आहे.
मुंबई महापालिकेच्या केईएम,सायन, नायर, कुपर आणि नायर डेंटल रूग्णालयातील सुमारे 500 डॉक्टरांना लागली इलेक्शन ड्युटी लावली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नर्सेसपासून डिनपर्यंत सर्वांना निवडणुकीचे काम लागल्याने रूग्णसेवेवर याचा परिणाम होणार आहे. मुंबई महापालिका रूग्णालयांतील सुमारे 80 टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर जाणार आहे.
निवडणूक कामातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-यांना सूट असतानाही निवडणूक आयोगाने डॉक्टरांना निवडणूक डयुटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केईएम रूग्णालयातील 900 पैकी 600 नर्सेसना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. यामुळे पालिकेच्या प्रमुख रूग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे
Post a Comment