हरियाणा, भारतीय रेल्वे अंतिम फेरीत दाखल. संघर्षमय लढती नंतर महाराष्ट्राचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात.
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर:-
सलग चार वेळा अंजिक्य असणाऱ्या भारतीय रेल्वेचा पराभव करीत हरियाणाने दणदणीत विजय मिळवला. हरियाणाने ३४ विरूद्ध ३१ असा सामना जिंकला. सामना जिंकताच प्रेक्षकांसह कबड्डी प्रेमी यांनी एकच जल्लोष केला.
हरियाणा, भारतीय रेल्वे यांनी "७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी" स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल. यजमान महाराष्ट्राने कडवा संघर्ष केला. पण शेवटच्या क्षणी त्यांना पराभव पत्करावा लागला. अहमदनगर, वाडिया पार्क क्रीडा संकुल येथील मॅट वर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने पहिल्या डावातील १३-२३ अशा १० गुणांच्या पिछाडीवरून महाराष्ट्राचे कडवा प्रतिकार ३५-३४ असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली. आक्रमक सुरुवात करीत १०व्या मिनिटाला पहिला लोण देत ११-०३ अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर ५व्या मिनिटाला लोणची परतफेड करीत हरियाणाने १९-२४ अशी कमी केली. त्यानंतर आक्रमक खेळ करीत ३१-३१ अशी बरोबरी साधली. शेवटी मोनु गोयतने महाराष्ट्राच्या शिलकी दोन गड्यांना टिपत महाराष्ट्रावर लोण देत ३५-३३ अशी आघाडी घेतली. शेवटी १गुणांनी हरियाणाने महाराष्ट्राला चकविले. आशू मनी, नितीन कुमार, मोनू गोयत यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महाराष्ट्र कडून आकाश शिंदे, असलम इनामदार, सौरभ राऊत यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण ते अयशस्वी ठरले.
दुसऱ्या सामन्यात भारतीय रेल्वेने चंदीगडचे आव्हान ५-५ चढायाच्या डावात ४३-४१ असे संपुष्टात आणीत अंतिम फेरीत धडक दिली. पहिल्या डावात १८-१७अशी चंदीगड कडे आघाडी होती. पूर्ण डावात ३७-३७ अशी बरोबरी करण्यात रेल्वेला यश आले. ५-५ चढायाच्या डावात शेवटी २गुणांनी बाजी मारली. पंकज मोहिते, एम. सुधाकर यांच्या संयमी चढाया त्यांना सुमित, सुरेंदर गील यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे रेल्वेला सलग ५व्यांदा अंतिम फेरी गठता आली. चंदीगड कडून राकेश, नरेंदर यांच्या चढायाचा, तर विशाल भारद्वाज, गुरदिप यांच्या पकडीचा खेळ उत्तम होता. पण चंदीगड विजयी करण्यात ते कमी पडले. अंतिम लढत देखील चुरशीची होईल असे या उपांत्य फेरीच्या सामन्यातून दिसून येते.
Post a Comment