माय अहमदनगर वेब टीम
पुणे - पुण्याच्या कात्रज परिसराजवळील दत्तनगरमध्ये दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस आलाय. घरगुती वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान खून करणारा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव श्वेता तळेवाले वय ४०, शिरोली तळेवाली वय १६ अशी आहेत. तर नराधम पतीचं नाव अजय तळेवाले वय ४५ असे आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि अजय यांच्यात वेळोवेळी भांडण होत होते. आर्थिक वादातून त्यांच्यामध्ये भांडणे व्हायची.
शुक्रवारी रात्रीदेखील या दोघांमध्ये वाद झाले. त्यावेळी पत्नी श्वेताने रागात माहेरी निघून जाणार असल्याचं पतीला सांगितलं. पती-पत्नीमधील वाद निवळल्यानंतर श्वेता झोपी गेली. त्यानंतर संतापलेल्या पतीने श्वेताच्या हाताची नस कापली त्यानंतर उशीने तिचं तोंड दाबून तिचा खून केला. नेहमी आईची बाजू घेणाऱ्या मुलीचादेखील अजयने खून केला. अजय तळेवाले हा फायनान्सची कामे करतो. ग्राहकांना कर्ज मिळवून देण्याचे काम तो करतो. दरम्यान या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
पत्नीनं असा केला प्लॅन
पिंपरी चिंचवड शहरात पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणल्याची घटना घडलीय. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील चिंबळी येथे ही घटना घडली आहे.पिंपरी चिंचवड शहरातील चिंबळी येथे राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या ३६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी राहुल सुदाम गाडेकर यांच्या हत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पोलिस पथकाने त्याची पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर आणि भारतीय सैन्य दलातील प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे आणि त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.
Post a Comment