उमेदवारी जाहीर होताच खासदार विखेंचे मोठे विधान...



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी मला पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करून माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांचे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा साहेबांचे, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शाह साहेबांचे तसेच राज्यात कार्यरत असलेले राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर जी बावनकुळे आणि ज्यांच्यामुळे माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवास सुरू झाला असे देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे आणि ज्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत अशा सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

निश्चितच या सर्वांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरून आणि संघटनेतील प्रत्येक घटकाला सोबत घेत निवडणुकीला सामोरे जात पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा राहील आणि देशाच्या जनतेची सेवा करेल व या संधीचे सोने पुन्हा एकदा करून दाखवेल अशी ग्वाही देतो असे खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post