माय अहमदनगर वेब टीम
वाळकी :ज्ञानरचना सोशल फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड -२०२४ (राष्ट्रीय शिखर पुरस्कार )अंतर्गत राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार लोकमतचे वाळकी प्रतिनिधी शरद कासार यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती फाउंडेशनचे संचालक प्रवीण साळवे संचालिका सुप्रिया चौधरी यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण (दि.१२ ) मे रोजी पणजी (गोवा) येथे होणार आहे.
शरद कासार यांनी आरोग्य, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, शासकीय, धार्मिक आदी क्षेत्रात वेळोवेळी उत्कृष्ट वार्तांकन करून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापुढे विषय मांडून ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे कार्य चांगले आहे.यापूर्वीही त्यांचा विविध संस्थाच्या वतीने कोरोना योद्धा, कर्तव्यदक्ष पत्रकार, उत्कृष्ट पत्रकार,पत्ररत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्ञानरचना सोशल फाउंडेशन हे दिवाळी सणाला गरजू निराधारांना फराळ, कपडे, महिलांना साडी वाटप,दुर्गम भागातील शाळांसाठी व्यायामाचे साहित्य, गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत.
Post a Comment