माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -
येणाऱ्या लोकसभेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने हजारो उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जोपर्यंत सरकारकडून मराठा समाजाची असणारी सगेसोयरे बाबत मागणी मान्य करुन कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही, असा निर्णय अहमदनगरमधील मराठा बांधवांनी घेतला आहे.
आज झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
नगर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरातील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणारा अमोल सुखदेव खुणे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर शपथ घेण्यात आली.
यामध्ये जोपर्यंत सरकार मराठा समाजाची सगे सोयरे बाबत मागणी मान्य करुव कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच येणाऱ्या लोकसभेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने हजारो उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Post a Comment