धक्कादायक! पत्नीसह दोन मुलींना पेट्रोल टाकून जाळले



नगर तालुक्यातील घटना ; आरोपीला पोलिसांनी केले अटक   

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - अज्ञात कारणावरून पत्नी आणि २ मुलींच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे सोमवारी (दि.२५) सकाळी ९ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनील गोरख लांडगे (रा. पिंपळगाव लांडगा, ता.नगर) यास ताब्यात घेतले आहे. 



आरोपी सुनील लांडगे हा त्याची पत्नी लीलाबाई, एक १४ वर्षाची मुलगी साक्षी व १ अवघे ९ महिने वयाची मुलगी ख़ुशी यांच्यासह पिंपळगाव लांडगा गावात राहात होता. सोमवारी (दि.२५) सकाळी ९ च्या सुमारास अज्ञात कारणावरून त्यांनी घरात पत्नी लिलाबाई, मुली साक्षी आणि खुशी यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. क्षणात आगीचा भडका होऊन त्या तिघी मायलेकी गंभीररित्या भाजून मयत झाल्या. या अमानवी कृत्यानंतर आरोपी घराबाहेर येवून बसला. परिसरातील नागरिकांना ही दुर्दैवी घटना समजताच त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच स.पो.नि. प्रल्हाद गिते हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून आरोपी सुनिल लांडगे यास ताब्यात घेतले. तर मायलेकींचे मृतदेह शवविच्छेदना साठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले.      

दरम्यान, सुनील लांडगे यानं हे अमानुष कृत्य का केलं, याचा शोध नगर तालुका पोलीस घेत आहेत. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post