धक्कादायक! अभिनेत्रीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओही बनवला



माय नगर वेब टीम 

झगमगत्या दुनियेतील धक्कादायक बाब समोर आली आहे. तरुणीला झगमगत्या दुनियेत नाव कमवायचे होते, पैसे कमवायचे होते. तीच्या याच जिद्दीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी तरुणीवर व्हिडिओ अल्बम आणि चित्रपटात भूमिका मिळवून देतो म्हणत तिच्यावर बलात्कार केला आहे. शूटिंगच्या बहाण्याने वेगवेगळ्या राज्यात व शहरांत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याचबरोबर, युवतीला अन्य लोकांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पोलिसांनी पिडितेच्या तक्रारीवरुन पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


उत्तर प्रदेशच्या कानपुर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. लखनौच्या साउथ सिटीयेथील रहिवाशी हेमंत कुमार राय यांच्यावर कानपुरच्या तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. युवतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हेमंत राय याने व्हिडिओ अल्बम आणि चित्रपटात काम मिळवून देतो,असं सांगत फसवणूक केली. त्याचबरोबर, चांगले पैसे मिळतील अशी स्वप्न दाखवत माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा विश्वासदेखील जिंकला होता. त्यानंतर शुटिंगच्या बहाण्याने मुंबई, गुवाहाटी, हैदराबादसह अनेक शहरांत नेऊन लैंगिक अत्याचार केला.


पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत तिच्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने मला व माझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळं मी माझ्यासोबत घडलेली घटना कोणालाही सांगू शकले नाही, असं पीडितेने म्हटलं आहे. आरोपीने पीडितेवर त्याच्या मित्रासोबतही संबंध ठेवण्यास भाग पाडले. आरोपीने तिला पोलिसांत न जाण्याची धमकी देत होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीता कानपुर येथील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी आहे. तिला फिल्म इंडस्ट्रीत करिअर करायचे होते. त्यासाठी ती प्रयत्न करत होते. आरोपीने तिचे काही व्हिडिओ पाहून तिला घरी बोलवले. त्यानंतर त्याच्या व्हिडिओ अल्बममध्ये तिला हिरोइन म्हणून काम दिले. आरोपीने तिच्यासोबत पाच व्हिडिओ बनवण्याचे आश्वासन दिले होते. एक दिवस आरोपीने मोठ्या हिरोसोबत म्युझिक अल्बम बनवण्याच्या बहाण्याने तिला मुंबईत घेऊन गेला. एका हॉटेलमध्ये रुम बुक केले आणि कोल्डड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळून तिच्यावर बलात्कार केला. तसंच, तिचे काही अश्लील व्हिडिओदेखील बनवले. त्यानंतर गुवाहाटी आणि हैदराबादमध्येही तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. 


आरोपीने पीडित तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. आरोपीच्या अत्याचाराला कंटाळून तरुणीने अनेकदा पोलिसांकडे जाण्याचे ठरवले मात्र त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर तरुणीने हिंमत एकटवून आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. व पीडितेच्या जबाबानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post