माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - युवतीसोबत चाळे करून तिच्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पाथर्डी शहरात राहणार्या पीडित युवतीने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या ओळखीच्या दोन तरूणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल माणिक तांबडे (रा. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. दिल्लीगेट नगर) व दिनेश महेश शिंदे (रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरूणांची नावे आहेत. सदरचा प्रकार जुलै 2023 पासून सुरू होता. पीडितीने सोमवारी (दि. 8) याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी युवतीचा मित्र दिनेश शिंदे हा वाढदिवस आहे म्हणून तिला डोंगरगण (ता. नगर) येथे घेऊन गेला होता. तेथे त्याने युवतीसोबत चाळे करून विनयभंग केला. तसेच 8 जुलै 2023 रोजी अमोल तांबडे याने वाढदिवस आहे, माझे सर्व मित्र- मैत्रीण येणार आहेत, तु पण ये असे खोटे सांगून युवतीला दिल्लीगेट येथील रूमवर बोलून घेतले. युवती तेथे गेल्यानंतर त्याने तिच्यासोबत चाळे करून विनयभंग केला. दरम्यान युवतीसोबत असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी वारंवार विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Post a Comment