स्पोर्ट डेस्क
मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा २ धावांनी विजय झाला. आयपीएल 2024 मध्ये आज पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाची सुरुवात खराब राहिली परंतु मागील सामन्यात विजयाचे शिल्पकार ठरलेले आशुतोष आणि शशांकने झुंजार टक्कर दिली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे हैदराबादची चिंता वाढली होती.
हैदराबादच्या संघाने दिलेल्या 183 धावांचे आव्हान पार करताना पंजाबची सुरुवात देखील चांगली राहिली नाही. सुरुवातीचे गडी लवकर बाद झाल्यानंतर पंजाबचा संघ लवकरच आपला खेळ आटोपणार असं वाटत होतं. परंतु मागील सामन्यात हिरो ठरलेले अशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांनी हैदराबादची चिंता वाढवली होती.
शशांक सिंगने आणि अशुतोषने संघाला विजया जवळ आणून सोडले. सामन्यातील चेंडू संपल्याने पंजाबला सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत आलेल्या सामन्यात पंजाबला अखेरच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती. तेव्हा मैदानावर उतरलेल्या अशुतोष शर्माने लगातार दोन षटकार ठोकले. सलग 2 षटकाराचा मारा पडल्याने दबावमध्ये आलेल्या जयदेव उनाडकदने 3 व्हाईड चेंडू फेकले. यामुळे धावांमधील अंतर अजून कमी झालं.
अखेरच्या 2 षटकात पंजाबला 10 धावा बाकी होत्या. त्यानंतर पुढील चेंडूवर शर्माला एकच धाव घेता आली. त्यानंतर स्ट्रइकवर आलेल्या शशांकने अखेरच्या चेंडूवर षटकार मारला आणि संघाला 181 धावांपर्यंत पोहोचवलं. शशांकने दमदार खेळी करत 25 चेंडूत 46 धावांची नाबाद खेळी केली, यात 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. तर अशुतोष शर्माने 15 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या, यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.
Post a Comment