Maharashtra Weather: अबब! दोन दिवस गारपीटीचा इशारा



माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई : राज्याच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर राज्यातील इतर भागांत गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुण्यासह राज्यातील हवामानात आज आणि उद्या दोन टोकांचे मोठे बदल पाहायला मिळणार आहे. आज दिवसभर उन्हाच्या तडाख्यासह विदर्भात उष्णतेची लाट असेल. तर उद्या राज्यातील बहुतेक भागात गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुणे जिल्ह्यात या काळात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 


तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र जणू तापलेला आहे. दिवसा उन्हाचा तडाखा, तर रात्री प्रचंड उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहे. रविवारपासून यातून काहीशी सुटका मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पूर्व विदर्भापासून, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा  पट्टा सक्रिय आहे. 


राज्यात सध्या आकाश ढगाळ होत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाच्या झळाआणि उकाडा कायम आहे. रात्री उष्ण ठरत असून, पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. हवामान विभागाने विदर्भात देखील तीन जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. तर आज आणि उद्या विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.


राज्याच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर राज्यातील इतर भागांत गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील तापमान ४२ अंशांच्या पुढे गेलेले आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमानात मोठी वाढ झाली आहे.


यवतमाळमधील 7 तालुक्यात शेती, फळबागांचे नुकसान, वाशीममध्ये बीजवाई कांदा उत्पादक आर्थिक संकटात

विदर्भात आज तापमान वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भात आज उष्णतेची लाट, तर उद्यापासून दोन दिवस पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. रविवारपासून अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्यामुळे विदर्भात रविवारी आणि सोमवारी पावसाचा इशारा देण्यात आलाय.


गुढीपाडव्याच्या दिवशी किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतेक भागांत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे. नागरिकांना आरोग्य जपन्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post