मी फक्त सहा महिनेच विरोधी पक्षाचा आमदार; प्राजक्त तनपुरे यांचे वक्तव्य चर्चेत...

 


माय अहमदनगर वेब टीम 

राहुरी - केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजप सरकार विशिष्ट यंत्रणेमार्फत विरोधी पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता याला जनता पुरती वैतागली आहे. जनताच ही निवडणूक हातात घेणार आहे. त्यामुळे आता मी देखील फक्त सहाच महिने विरोधी पक्षाचा आमदार आहे. सहा महिन्यानंतर निवडणुकी झाल्या की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. आणि त्यावेळी आपण या मतदारसंघात पुन्हा एकदा विकास गंगा आणू असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे.


   लोकप्रतिनिधी हा विकास कामे करण्यासाठी असतो. मात्र यांचे अपयश झाकविण्यासाठी यांनी मतदारसंघात डाळ आणि साखर वाटली. मात्र ती वाटलेली डाळ देखील पुरवठा विभागाची भ्रष्टाचाराची असल्याची माहिती कळते. त्यामुळे लवकरच आपण त्याची चौकशी लावणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेद्वार निलेश लंके यांनी म्हटले आहे. तर डाळ अन् साखर वाटणाऱ्या खासदाराची गिनीज बुकात नोंद करावी, अशी मिश्किल टिप्पणी देखील यावेळी लंके यांनी केली आहे.

         राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेद्वार मा. आमदार निलेश लंके यांची राहुरी तालुक्यामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू आहे. यात्रेच्या सहाव्या दिवशी मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, म्हैसगाव, कानडगाव, निंभेरे, तांभेरे सोनगाव, साञळ आदी परिसरामध्ये निलेश लंके सह राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

         यावेळी लंके यांनी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत टिका केली की, गणेश सहकारी साखर कारखाना,  डाॅ.तनपुरे सहकारी साखर कारखाना यांनी बंद पाडला. नगर चा उड्डाणपूल केल्याच्या बढाया मारतात पण तो उड्डाणपूल स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून झाल्याचे खुद्द नितीन गडकरी यांनी सांगिले आहे. तर जो  नगर-मनमाड रस्ता आहे या रस्त्यावर झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावे लागले तो रस्ता देखील करता आला नाही. कांद्याची निर्यात बंदी असेल किंवा दुधाचे भाव आणि त्याचे अनुदान असेल या कामात देखील त्यांना सपशेल अपयश आले मात्र स्वतःचे अपय झाकविण्यासाठी नको ते उद्योग हे लोक करत असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post