खासदर सुजय विखेंचे ओपन चॅलेंज; 'ती' गोष्ट शक्य झाल्यास निवडणूक लढणार नाही

 


नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा 

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच रंगतदार वळणावर आली आहे. जाहीरपणे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आज महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी महाआघाडीचे विरोधी उमेदवार यांना ओपन चॅलेंज दिले आहे. मी संसदेत मांडलेले मुद्दे, हिंदी, इंग्रजीमधील भाषण तोंड पाठ करून जरी एका महिन्यात बोलून दाखविले तरी मी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार नाही. असे ओपन चॅलेंज देत खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला.

नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



यावेळी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, लोकसभेला आपल्याला का उभे राहायचे आहे. संसद भवनमध्ये आपल्याला का जायचे आहे हे अगोदर कळले पाहिजे. गेल्या पाच वर्षात आमदार संग्राम जगताप आणि मी मतभेद बाजूला ठेवून नगर शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच शहरातील उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, पाणी योजना यांसारखे महत्वाचे प्रश्न सोडवू शकलो. 

(पहा व्हिडीओ 🖕🏻🖕🏻🖕🏻🖕🏻)

संसद भवनमध्ये अनेक प्रश्न मांडले. मतदार संघातील प्रश्न सोडविले. मी संसदेत मांडलेले मुद्दे, हिंदी, इंग्रजीमधील भाषण तोंड पाठ करून जरी एका महिन्यात  विरोधी उमेदवाराने बोलून दाखविले तरी मी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार नाही. असे ओपन चॅलेंज देत खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधी उमेदवार आमदार नीलेश लंके यांचा चांगलाच समाचार घेतला. अहमदनगर लोकसभा मतदार संघातील विरोधी उमेदवाराचे डिपॉजिट जप्त होईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. त्यांनी सर्वांनी खासदार सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post