माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या कर्जदार व बँकेच्या अधिकाऱ्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत. तसेच, या व्यतिरिक्त चार जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत. यातील आठ जामीन अर्जांवर (१ एप्रिल) व एका जामीन अर्जावर (२ एप्रिल) न्यायालयात सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये अनपेक्षित नावे आल्याने बँकेच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्बन बँक घोटाळ्याचा तपास सुरू आहे. यात अटकेत असलेल्या अमित वल्लभराय पंडित याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. तर, राजेंद्र शांतीलाल लुनिया, प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका असलेल्या १०५ जणांची यादी लिक झाल्यानंतर अनेक संशयित पसार झाले आहेत. त्यातील काहींसह ज्यांची या यादीत नावे नाहीत अशांनीही अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. कमलेश हस्तीमल गांधी, महादेव पंढरीनाथ साळवे, यज्ञेश बबन चव्हाण, देवेंद्र दिलीप गांधी, प्रगती देवेंद्र गांधी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यावरही आज सुनावणी होणार आहे. बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या वतीने ॲड. अच्युत पिंगळे स्वतंत्रपणे बाजू मांडणार असल्याचे फिर्यादी राजेंद्र गांधी यांनी सांगितले.
Post a Comment