माय अहमदनगर वेब टीम
बारामती : लोकसभा निवडणूक जशी जवळ येतेय तशी राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी वेग धरु लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये 2 गट पडल्याने येथील कलगीतुरा दिवसेंदिवस रंगतदार वळण घेतोय. राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर आता पवार घराण्यातही 2 गट पडल्याचे दिसून येते. पवार घराण्यातील अनेकजण थोरल्या पवारांचा प्रचार करताना दिसतात. यावर अजित पवारांनी भाष्य केले होते. यावर आता रोहित पवारांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज केलंय.
मागील दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीमधील सभेमध्ये आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. आपल्या भावंडांबद्दल त्यांनी विधान केले. माझी भावंडे कधीच माझ्यासाठी प्रचाराला उतरली नाहीत.मात्र सध्या पायात भिंगरी बांधल्यावाणी ते बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत, असे ते म्हणाले होते. पावसाळ्यात छत्री उगवल्यावाणी हे सर्व लोक उगवले आहेत. मात्र मी जर यांच्या बद्दल तोंड उघडले तर तोंड उघडायला जागा राहणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला होता.
अजित पवार यांच्या टीकेवरुन पवार कुटुंबात नाराजीचा सूर उमटलेला दिसतोय. यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंदापूर मधील आज झालेल्या सभेत रोहित पवारांनी अजित पवारांना ओपन चॅलेंज दिले आहे.
दादांनी काय बोलायचे ते एकदाच बोलून टाकावे.तुम्ही तुमच्या भावंडाबद्दल माणसात येऊन सांगा. मग तुमची भावंड तुमच्याबद्दल बरेच काही गोष्टी सांगतील, असे ओपन चॅलेंज रोहित पवार यांनी अजित पवार यांना दिले आहे.
Post a Comment