बिझनेस : ओला इलेक्ट्रिकची आर्थिक वर्षात मोठी गरुड झेप, पहा किती झाली विक्री...



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर : ओला इलेक्ट्रिकने मार्च महिन्यात आपल्या ५३,००० हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी (वाहन पोर्टलनुसार) झाले असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने सलग पाचव्या महिन्यातआपल्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीमध्ये वाढ नोंदवत आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्रीची ही नोंद केलीआहे.कंपनीने आर्थिक वर्ष २०२३च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ११५ टक्केची वर्ष-दर-वर्ष वाढ साधली आहे. कंपनीने २०२३ मध्ये १,५२,७४१ युनिट्सच्या तुलनेत २०२४ च्या आर्थिक वर्षात  ३२८,७८५ युनिट्सची विक्री केली.  


मार्चमधील उत्कृष्ट कामगिरीसह, कंपनीने आपला बाजारपेठेतील आघाडीचा हिस्सा कायम राखला आहे. तसेच कंपनीने मागील तिमाहीत ८४,१३३ युनिट्सच्या तुलनेत २०२४ च्या आर्थिक वर्षच्या चौथ्या तिमाहीत ११९,३१० वाहनांची विक्री नोंदणी करून तिमाही-दर-तिमाही मध्ये ४२% वाढ नोंदवली. 


ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी अंशुल खंडेलवाल म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२४ चा शेवट हा आमच्यासाठी यापेक्षा चांगला असू शकला नसता. गेले वर्ष हे आमच्यासाठी तसेच ईव्ही उद्योगासाठी महत्त्वाचे ठरले आहे. गेल्या आर्थिक वर्षभरात आम्ही मार्केट लीडर होतो. आम्ही विकलेल्या वाहनांच्या संख्येत व बाजारातील वाटा यामध्ये सातत्यपूर्ण वाढ नोंदवत आमची आघाडी ही आम्ही कायम राखली आहे.


एकट्या आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत आम्ही जवळपास १.२० लाख वाहनांची नोंदणी केली आहे. हे स्कूटर विभागामध्ये आमचे आघाडी दर्शवते. वाढीचा हा मार्ग पुढे चालू ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. तसेच याद्वारे भारताच्या विद्युतीकरण प्रवासात आम्हाला योगदान देयाचे आहे. 


ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच ईव्हीचा अवलंब करण्यामधील सर्व अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नात उत्पादने,सेवा, चार्जिंग नेटवर्क आणि बॅटरी वॉरंटी अशा अनेक क्षेत्रांसाठी नवीन उपक्रमांची घोषणा केली आहे. एस वन एक्स (४केडब्ल्यूएच) लाँच करून, ओला इलेक्ट्रिकने


 सहा उत्पादनांच्या (एसवन प्रो , एसवन एअर, एसवन एक्स प्लस, एसवन एक्स- २ केडब्ल्यूएच, ३ केडब्ल्यूएच , ४ केडब्ल्यू एच)


पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.ही वाहने विविध किंमतींच्या श्रेणींमधील आहेत व  विविध आवश्यकता असलेल्या ग्राहकांना पूरक अशी आहेत. 


ओला इलेक्ट्रिकने कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीसाठी ८वर्षे/८०,०० किमी विस्तारित बॅटरी वॉरंटी सुरू केली आहे. ओला इलेक्ट्रिकचा विश्वास आहे की वाहनांचे आयुर्मान वाढवून ईव्हीवापरतील एक अडथळे दूर करतात आहे. ग्राहक आता ॲड-ऑन वॉरंटी देखील निवडू शकतात आणि रुपये ४,९९९/- च्या नाममात्र सुरुवातीच्या किमतीत १२५,००० किमी पर्यंत प्रवास केलेल्या किलोमीटरची वरची मर्यादा वाढवू शकतात. ओला इलेक्ट्रिकने ३ केडब्ल्यू ची पोर्टेबल फास्ट चार्जर ऍक्सेसरी देखील सादर केली आहे. ते रुपये २९,९९९/- मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.देशभरात सेवा नेटवर्कचा विस्तार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post