माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सत्तेत असतांना शरद पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? असा सवाल करत पवारांनी जिल्ह्याचे वाटोळे केले असा हल्लाबोल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पवार यांच्यावरील टिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच काही सवाल उपस्थित केले आहेत.
जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले, सुपा एमआयडीसी कोणी आणली हा त्यांना विसर पडलाय, त्यांना कारखाना वाचवण्यासाठी आप्पासाहेब पवार लागतात याचाही त्यांना विसर पडलाय. असे सांगत विखे यांच्या टिकेचा फाळके यांनी निषेध नोंदवला. पवारांना उमेदवार आयात करावा लागला यावर त्यांनी गत निवडणुकीत आपले चिरंजीव एनवेळी भाजपामध्ये आयातच होते याचीही त्यांनी आठवण करून दिले. शरद पवार देशाचे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्यावर टिका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा फाळके यांनी दिला.
Post a Comment