किरण काळे यांचा संतप्त सवाल: "रस्त्यांच्या निकृष्ट कामाच्या २०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी अँटी करप्शन विभाग केव्हा कारवाई करणार?"

 


माय नगर वेब टीम 

अहमदनगर: मनपातील बड्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अलीकडेच कारवाई केली आहे. मात्र, काँग्रेसच्या वतीने या कारवाईचे स्वागत करत असताना, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी विभागाला संतप्त सवाल केला आहे. "नगर शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांच्या भ्रष्टाचार प्रकरणी २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अँटी करप्शन विभाग कारवाई कधी करणार?" 

काळे म्हणाले की, "मनपा भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे. नगररचना, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत या सर्व विभागांत भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. मनपा अधिकारी आणि राजकीय पुढारी या भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, ज्यामुळे नगर शहर खड्ड्यांचे आणि कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाते. 

विद्यमान मनपा आयुक्तांसह बांधकाम विभागातील अधिकारी निकृष्ट रस्ते कामांच्या २०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात गुंतले आहेत. बनावट टेस्ट रिपोर्ट तयार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भात सर्व पुरावे राज्याच्या अँटी करप्शन प्रमुखांकडे आठ महिने आधीच सादर करण्यात आले होते. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही."

काळे यांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे, "अँटी करप्शन विभागाने या प्रकरणात देखील तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, "नगरकरांच्या वतीने आम्ही या कारवाईचे स्वागत करू."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post