विधानसभेच्या रिंगणातून बाद करण्यासाठी माझ्या हत्येचा कट : किरण काळे



गृहमंत्री साहेब, माझ्या नावे ३० लाखांची सुपारी देणाऱ्या मास्टरमाईंडचा तपास लावा

माय नगर वेब टीम 

अहमदनगर: शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत काळे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून आपल्याला बाद करण्यासाठी काही लोकांनी 30 लाखांची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन पाठवून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

काळे म्हणाले, "नगरमध्ये राजकारणाची पातळी खालच्या स्तराला गेली आहे. विरोधकांनी माझी हत्या करण्याचा कट रचला आहे. केडगाव शिवसैनिक हत्याकांडाची पुनरावृत्ती करायची आहे. गृहमंत्री साहेब, माझ्या हत्येचा कट रचणाऱ्यांचा तपास करा."

**काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार**

अल्पवयीन मुलांच्या धिंड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर किरण काळे म्हणाले, "धिंड काढलेल्या मुलांची सुपारी घेतल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. हा केवळ राजकीय षडयंत्राचा भाग आहे. मी कोणत्याही आरोपींशी कधीही संपर्कात नाही. माझेही कॉल डिटेल्स तपासा, दूध का दूध, पाणी का पाणी होईल."

**मास्टरमाईंडचा तपास करा**

काळे यांनी पोलिसांना आवाहन केले आहे की, "कोण माझ्या नावाचा गैरवापर करून 30 लाखांची सुपारी दिली, याचा तपास करा. आरोपींची कॉल रेकॉर्डिंग, सीडीआर, एसडीआर तपासा. खऱ्या मास्टरमाईंडला शोधून त्यावर कठोर कारवाई करा."

**आरोपींची ऑडिओ क्लिप समोर**

प्रकरणातील आरोपींची 1 तास 17 मिनिटांची ऑडिओ क्लिप काळे यांनी माध्यमांना दिली आहे. या क्लिपमध्ये विद्यमान खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे यांचाही उल्लेख आहे. आरोपींनी 30 लाखांच्या सुपारीसाठी षडयंत्र रचल्याचे या क्लिपमध्ये दिसते.

**पोलिसांच्या कारवाईची मागणी**

काळे यांनी पोलिसांना आवाहन केले आहे की, "धिंड काढलेल्या आरोपींवर पोस्को लावा. अल्पवयीन मुलांची धिंड काढणे हा गंभीर गुन्हा आहे. माझ्या हत्येची सुपारी देणाऱ्यांचा मास्टरमाईंड शोधा."

**आरोपींना पोलीस कोठडी**

या प्रकरणात प्रवीण गीते, विशाल काटे, विशाल कापरे, हर्षद गायकवाड या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post