अल्पवयीन मुलांची धिंड प्रकरणात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कारभारी अडचणीत?



पोस्को का लावला नाही? अधिवेशनात गाजणार मुद्दा...

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : नगर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आहे. अल्पवयीन मुलांची धिंड प्रकरणात आरोपींचा गुन्हा अगोदर नोंदविण्यात आल्याचे भयान वास्तव समोर आले असून अल्पवयीन मुलांच्या कुटुंबियांना सुरुवातीला पोलिसांनी दाद दिली नसल्याचे त्या मुलांच्या कुटुंबियांकडून सांगितले जात आहे. सध्या अधिवेशन सुरु असून अधिवेशनात अहमदनगनचा अल्पवयीलन मुलांचे धिंड प्रकरण गाजणार असल्याचे बोलले जात आहे. 

अहमदनगरमधील नवनागापूर परिसरात अल्पवयीन मुलांची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. ज्या अल्पवयीन मुलांची धिंड काढण्यात आली त्याबाबतची फिर्याद नोंदविताना फिर्यादी अल्पवयीन आहेत हे माहीत असून देखील चाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट, 2012 मधील तरतुदीनुसार  पोस्को लावण्याची तरतूद आहे. तरी देखील पोस्को एमआयडीसी पोलिसांनी का लावला नाही? पोलिस कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. अल्पवयीन मुलांची अर्ध नग्न धिंड काढल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून तशा बातम्या देखील प्रसारित झाल्या आहेत. असे असताना देखील त्या घटनेचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही हे धक्कादायक आहे. हे रेकॉर्डवर का आणले गेले नाही ? ज्यांनी धिंड काढली त्यांची आधी फिर्याद नोंदवून घेण्यात आली. मात्र अल्पवयीन मुलांचे पालक एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन टाहो फोडत तक्रार करत असताना देखील त्यांची फिर्याद एक दिवस उशिराने नंतर का नोंदवली? असे अनेक सवाल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी उपस्थित करत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान धिंड प्रकरणात आरोपी यांच्यावर पोस्को कलम वाढविण्यात आले असून अजून चार जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

एमआयडीसी पोलिसांचा वचक संपलाय...

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्ददीमध्ये खून, लुटमार, दरोडे, चोऱ्या यांसारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अवैध धद्ययांनी डोके वर काढले आहे. त्यातच आता नव्याने अल्पवयीन मुलांची धिंड प्रकरण राज्यात गाजले आहे. सध्या अधिवेशन सुरु असल्याने हे प्रकरण अधिवेशनात गाजण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. वारंवार घडणाऱ्या घटनांवरून एमआयडीसी पोलिसांचा वचक संपलाय का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीच लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post