माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थी हे सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहतील असा विश्वास नाथकृपा ट्रॅव्हल्स चे संचालक बाप्पू दारकुंडे यांनी व्यक्त केला आहे. दारकुंडे यांच्या वतीने बहिरवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
बहिरवाडी येथील वाकी वस्ती प्राथमिक शाळा व बहिरवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बापू दारकुंडे यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यास कंपास, वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप दारकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना दारकुंडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लासेस नसताना देखील ग्रामीण विद्यार्थी मिळवत असलेले यश हे वाखाणण्याजोगे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सरपंच अंजना येवले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गावातील वाढदिवस, शुभकार्य तसेच स्मृतिप्रित्यर्थ वायफळ खर्च न करता वृक्षारोपण व शाळेसाठी मदत असा पायंडा पाडला तर विद्यार्थी व ग्रामस्थांच्या हितासाठी राहील. यापुढे प्रत्येक ग्रामस्थांनी आपला वाढदिवस साजरा करताना वृक्षारोपण तसेच शाळेसाठी मदत करावी. त्याचबरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात यावेत. यामुळे गावचा विकास होईल. आपल्या गावचा आदर्श इतर गावे देखील घेतील असा विश्वास सरपंच येवले यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने बापू दारकुंडे यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच मधुकर पाटोळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजू दारकुंडे, संजय येवले, दशरथ दारकुंडे, नीलकंठ दारकुंडे, कांतीलाल पाटोळे, विजय दारकुंडे, आजिनाथ काळे, बाळासाहेब पाटोळे, संजय दारकुंडे, अशोक बेरड, शहाराम बेरड, सर्व ग्रामपंचायत सदस्य शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
______________________
दारकुंडे यांचा आदर्श घ्यावा !
आपण ज्या शाळेत शिकलो मोठे झालो त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाप्पू दारकुंडे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. बाप्पू दारकुंडे यांचा इतर ग्रामस्थांनीही आदर्श घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजू दारकुंडे यांनी यावेळी केले.
___________________
Post a Comment