Ahmednagar Breaking : आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासह पीए लाचखोरीच्या जाळ्यात



बांधकाम परवानगीसाठी आठ लाखांची मागणी । जालन्याच्या पथकाची कारवाई

माय नगर ववेब टीम 

Ahmednagar Breaking : नगरच्या महापालिकेत लाचखोरीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बांधकाम परवानगीसाठी आठ लाख रुपयांच्या लाच मागणीच्या प्रकरणात आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे यांच्यावर जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



बांधकाम परवानगीसाठी आयुक्त जावळे यांनी ९ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराकडून पडताळणी केली असता, जावळे यांनी स्वीय सहायक देशपांडे मार्फत आठ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. 

कारवाईदरम्यान आरोपी आयुक्त जावळे आणि देशपांडे हे महापालिकेत हजर नव्हते. आरोपींची माहिती लीक झाल्याने ते फरार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कारवाईच्या निमित्ताने भाजपने महापालिका कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. 

पथकात यांचा सहभाग

मार्गदर्शक संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. छत्रपती संभाजीनगर), मुकुंद आघाव (अप्पर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर), सापळा अधिकारी किरण बिडवे (पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना), सहाय्यक सापळा अधिकारी शंकर मुटेकर (पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना) या अधिका-यांसह सापळा पथकात पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, आतिश तिडके, गजानन खरात, विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर या जालन्यातील कर्मचा-यांचा सहभाग होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post