माय नगर वेब टीम
अहमदनगर :* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार नीलेश लंके यांची बुधवारी संसद परिसरात भेट झाली. गडकरी यांनी लंके यांना आपुलकीने जवळ घेत आस्थेने विचारपुस केली व मतदारसंघातील कामांसाठी सदैव पाठीशी असल्याचा विश्वास दिला. यावेळी लंके यांनी समाजसेवेची उर्जा गडकरी यांच्या माध्यमातून मिळते असे सांगितले.
नीलेश लंके यांनी २०२९ मध्ये विधानसभेचे सदस्य म्हणून कार्य सुरू केले होते. अण्णा हजारे यांच्या माध्यमातून मंत्री नितिन गडकरी यांच्याशी त्यांचे संपर्क होते. कोरोना काळात लंके यांनी केलेल्या कार्यामुळे गडकरी प्रभावित झाले होते व त्यांनी लंके यांचे कौतुक केले होते. लंके यांच्या मतदारसंघातील कामांसाठी गडकरी यांच्याकडे त्यांनी वारंवार भेट घेतली होती, मात्र संसद सदस्य नसल्याने त्यांना काही मर्यादा होत्या. आता खासदार झाल्यामुळे लंके यांना केंद्र सरकारच्या विविध कामांसाठी गडकरी यांची मदत मिळेल.
**गडकरींच्या हस्ते पुरस्कार हे भाग्य**
लोकमत वृत्तसमुहाने लंके यांना कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला होता. लंके यांनी त्यावेळी सांगितले होते की, गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे देशभरात रस्त्यांचे जाळे उभे राहिले आहे.
**पाथर्डी रस्त्याचे काम सुरू झाले**
अहमदनगर, पाथर्डी, नांदेड, निर्मल तसेच अहमदनगर, राहुरी, शिर्डी, कोपरगांव या रस्त्यांचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यासाठी लंके यांनी उपोषण केले होते. अजित पवार यांनी गडकरी यांच्याशी संपर्क साधून कामे सुरू करण्याचे आवाहन केले. गडकरी यांनी तत्काळ बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सुचना दिल्या आणि त्या दिवशीच कामास प्रारंभ झाला. त्यामुळे लंके यांचे उपोषण सुटले.
**गडकरींकडे पाहून उर्जा मिळते**
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची संसद भवन परिसरात भेट झाली. गडकरी यांनी आपुलकीने जवळ घेऊन आस्थेने विचारपूस केली व दिलखुलास संवाद साधला. गडकरी यांच्याकडे पाहून समाजसेवेची उर्जा मिळते, असे लंके यांनी सांगितले.
**खासदार नीलेश लंके**
Post a Comment