आ. संग्राम जगताप यांनी केली रस्त्यांची पाहणी: भूमिगत गटार व काँक्रिटीकरण कामाची तयारी



माय नगर वेब टीम 

अहमदनगर : राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या १५० कोटी रुपयांच्या निधीमुळे नगर शहरातील रस्त्यांचे काम मार्गी लागणार आहे. आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान, पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव या रस्त्याच्या काँक्रीटीकरण आणि भूमिगत गटाराच्या कामाची पाहणी केली.

या भागातील गटारी ४०-५० वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या आता जीर्ण झाल्या असून, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडत आहेत. यामुळे नागरिक, व्यापारी आणि दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे. 

आ. संग्राम जगताप म्हणाले, "या समस्येचा कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. भूमिगत गटार आणि रस्त्याचे काँक्रीटीकरण नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे."

पाहणीवेळी विकी वाघ, प्रा. अरविंद शिंदे, रवी दंडी, सारंग पंधाडे, सुरज जाधव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विकी वाघ यांनी सांगितले की, "हा रस्ता मुख्य बाजारपेठ असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल."

आ. संग्राम जगताप यांनी पावसात नागरिकांशी संवाद साधत भूमिगत गटार आणि रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post