नगरमध्ये काँग्रेसकडून किरण काळे यांच्या उमेदवारीचे माजी मंत्री थोरातांकडून संकेत



काळे समर्थकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन, उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांनी केली जोरदार मागणी 

माय नगर वेब टीम 

अहमदनगर : नगर शहराच्या विकासाचा अत्यंत सुंदर असा आराखडा किरण काळे यांनी आजच्या भाषणात मांडला आहे. परिवर्तन होणार, नगर बदलणार असं घोषवाक्य शहरात काँग्रेसने दिल आहे. काळे यांच्या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला नगर शहरामध्ये झालेला दिसेल, आपल्याला विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल, शहरात भयमुक्त आनंदाचे वातावरण तयार झालेल्या दिसेल. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीच सरकार येणार आहे. त्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवावा लागणार आहे. 

यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरात यांना नगर शहराची जागा काँग्रेसकडे घेत महाविकास आघाडीच्या वतीने किरण काळे यांना उमेदवारी देण्याचे साकड घातलं. थोरात यांनी देखील त्याला प्रतिसाद देत किरण काळे यांच्या विधानसभा उमेदवारीचे संकेत आपल्या भाषणात दिले. शहरात काँग्रेसच्या वतीने महासंकल्प मेळावा - लक्ष्य विधानसभेचे याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी थोरात बोलत होते. यावेळी मेळावास्थळी आणि परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि भावी आमदार किरण काळे अशी जोरदार बॅनर बाजीबाजी केल्याचे पाहायला मिळाले. 


यावेळी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या विजयाचे शिल्पकार -  किंगमेकर म्हणून काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात व नवनिर्वाचित खा. निलेश लंके यांचा किरण काळे व जयंत वाघ यांनी सत्कार केला.


यावेळी व्यासपीठावर आ. लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, दशरथ शिंदे, सुनील क्षेत्रे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, स्वप्निल पाठक, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, उषा भगत, आशा लांडे, मिनाज सय्यद, हेमंत ओगले, कैलास शेवाळे, करण ससाणे, किरण पाटील, सचिन गुजर आदींची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post