माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील बारादरी शिवारातील चाँदबिबी महाल येथे व्यायामाकरीता गेलेल्या काका - पुतण्यावर पाच जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, चाकू, दगडाने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी संग्राम पोपट पोटे (वय 30 रा. बारादरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर ठोंबरे (पूर्ण नाव, पत्ता नाही), अक्षय संजय हम्पे (रा. भिंगार) व त्यांच्या सोबतचे तीन साथीदार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम पोटे व त्यांचा चुलत पुतण्या यश पोटे हे दोघे बुधवारी (24 जुलै) सायंकाळी चाँदबिबी महालावर व्यायामासाठी गेले होते. तेथे एका चारचाकी वाहनातून पाच जण आले. शिवीगाळ करून ‘तु साईटला होतो का, तु आम्हाला ओळखत नाही का, आम्ही नगरचे बाप आहोत’ असे म्हणून त्यांनी फिर्यादीसह पुतण्या यशला मारहाण केली. घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी व त्यांचा पुतण्या नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना संशयित पाच जणांनी चाँदबिबी महालाच्या पायथ्याशी त्यांचे चारचाकी वाहन आडविले. लाकडी दांडके, चाकू, दगडाने मारहाण करून वाहनाचे नुकसान केले. फिर्यादी व त्यांचा पुतण्या पोलीस ठाण्याच्या बाहेर आले असता तेथे येऊनही त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेजवळ करत आहेत.
Post a Comment