आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट ते गंज बाजार रस्ता कामाचा शुभारंभ
माय नगर वेब टीम
अहमदनगर : शहराची विकास कामे करीत असताना या पाच वर्षांमध्ये कोरोनाचे संकट आपल्यावर ओढावले, आणि सरकार बदलाबदलीमध्ये फार वेळ गेला आणि विकास कामे करीत असताना अडचणी आल्या, मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती दिली. मी सरकारमधला प्रतिनिधी असल्यामुळे शहर विकासाला भरभरून निधी मंजूर करून आणला आहे. आता ती कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. विकासाची कामे सुरू असल्यामुळे नागरिकांना देखील त्याची प्रचिती येत आहे. काही लोक आता मी मंजूर केलेल्या कामाची माहिती घेऊन आंदोलने करणार आहेत. त्यांना माहिती आहे की आता काम सुरू होणार आहे. त्याचे आपण श्रेय घेऊ, रामचंद्र खुंट ते कोठी चौक हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता मात्र कोविडच्या संकट काळामध्ये निधी उपलब्ध नसताना देखील कै. रसिक कोठारी यांनी या रस्त्याचे दर्जेदार काम करून दिले आहे. अजून पर्यंत हा रस्ता मंजूर नाही कोविड काळामध्ये निधी उपलब्ध होत नव्हता हा सर्व निधी आरोग्यासाठी वळविला होता. तरी देखील विकासाची कामे सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले रामचंद्र खुंट ते गंज बाजार या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. आता या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट ते गंज बाजार तपकीर गल्ली येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, भा कुरेशी, दीपक अग्रवाल, कमलेश भंडारी, गुड्डू खताळ, सागर मुर्तडकर, गोपाल चांडक, किसन बंग, हरी किसन बियाणी, शिवकांत हेडा, गणेश बंग, हिनय पटेल, गौतम राका, दुल्लक पटेल, सत्यनारायण झंवर, सुभाष झंवर, मनोज बिहाणी, राजेश हेडा, रामेश्वर लाहोटी, पारस बडजाते, शैलेश जाजू, बाळकृष्ण बंग, पवन बंग, विजय गांधी, सचिन झंवर,तुषार लड्डा, ललिता झंवर,चंदा बंग, सविता बिहानी, राजेंद्र सोनी, सुनील छाजेड, मनीषा हेडा, प्रियंका झंवर, दीपिका बंग आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप पुढे बोलताना म्हणाले की, शहरांमधील विविध भागांमध्ये रस्ता कॉंक्रिटी करण्याची कामे सुरू आहे या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडत आहे, तसेच नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागत आहे. आता लवकरच शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ते माणिक चौक, कापड बाजार, सर्जेपुरा ते पत्रकार चौकापर्यंत रस्ता काँक्रीटकरण्याचे काम सुरू होणार असून विविध रस्त्यांसाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या आहेत ही कामे लवकरच सुरू होणार आहे. शहराला जोडणारा तारकपूर रस्ता कॉंक्रिटी करण्याचे काम सुरू झाले आहे. आता निवडणूक आल्या आहेत शहरातील काही स्वयंघोषित पुढारी जनतेच्या सुखदुःखात कोविडच्या काळात दिसले नाहीत. मात्र जशा जत्रा आल्या की गावातील लोक दोन दिवस गावाकडे येत असतात तशी ही मंडळी निवडणुकीच्या जत्रेमध्ये सामील होतील आणि दिशाभूल करतील मात्र संकट काळामध्ये कधी दिसणार नाही मात्र आम्ही लोक कोविड संकट काळात नगरकरांबरोबर राहिलो. आरोग्याची सेवा देण्यासाठी जिल्ह्याचे ठिकाण नगर शहर असल्यामुळे येथे ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने येत होते. त्यांना देखील मदत करण्याचे काम केले आहे सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत विकासाची कामे देखील उभी केले आहे. या कामांमध्ये नगरकरांनी देखील सहकार्य करीत लोकसहभाग घेत शहर विकासाला हातभार लावला आहे. उपनगराचा सुरू असलेल्या विकास कामामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नवनवीन बाजारपेठा निर्माण होतील व रोजगार निर्मिती देखील होईल यासाठी आम्ही व्यापाऱ्यांना केंद्रबिंदू मानत काम करत आहे. शहरामध्ये सुरक्षित वातावरण असल्यामुळेच महानगरातील नवनवीन बिल्डर येऊन आपले प्रकल्प राबवीत आहेत असे ते म्हणाले.
अविनाश घुले म्हणाले की प्रभाग क्रमांक 11 चा नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लावले असल्यामुळेच बहुतांश रस्त्याची कामे पूर्ण झाले आहे बोटावर मोजण्याइतकीच रस्ते बाकी आहेत ती कामे आता पूर्ण होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागत आहे, शहरामध्ये चांगले काम उभे राहत असल्यामुळे नागरिकही समाधान व्यक्त करत आहे. आरोग्य, क्रीडा, चौक सुशोभीकरण, शिक्षण, आदीसह विकासाची कामे सुरू आहेत असे ते म्हणाले.
कमलेश भंडारी म्हणले की, नगर शहराच्या विकासासाठी आजपर्यंत जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहर विकासाला मिळाला आहे, रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांपासून त्यांनी काम सुरू केले आहे. व्यापारी वर्ग महापालिकेकडे सर्व प्रकारचा कर भरत असतो. मात्र गेल्या दहा वर्षापासून तपकीर गल्लीतील रस्त्याचे काम प्रलंबित होते. आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केल्यानंतर या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागले आहे. ते नेहमीच व्यापारी यांचे प्रश्न मार्गी लावत असतात असे ते म्हणाले.
Post a Comment