मुंबई उच्च न्यायालयाचा खासदार निलेश लंके यांना मोठा दिलासा



राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत खा. नीलेश लंके मतदान करणार !

माय नगर वेब टीम 

अहमदनगर :   राज्य कब्बडी संघटनेच्या निवडणुकीत खासदार नीलेश लंके तसेच सच्चिदानंद भोसले यांना मतदान करण्याचा अधिकार  मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.

      राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीसाठी अंतिम यादीतील बदल अहवाल वेळेत न दिल्याचे कारण देत मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाठविण्यात आलेले अवैध ठरविल्याच्या निर्णयाविरोधात खा. नीलेश लंके व सच्चिदानंद भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद धाव घेतली होती.

       लंके व भोसले यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणूकीसाठी अहमदनगर जिल्हा संघटनेने मतदार म्हणून पाठविलेली खा. नीलेश लंके व सच्चिदानंद भोसले यांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पहिल्या यादीत अवैध ठरविली होती. या निर्णयाविरोधात म्हणणे मांडण्यासाठी ३ जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती. संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या मुदतीत सर्व अटींची पुर्तता करण्यात आली होती. त्यानंतरही खा. लंके,  भोसले यांच्यासह इतर जिल्हयातील काही नावे अवैध ठरविण्यात आली होती. 

    अवैध ठरविण्यात आलेल्यांमध्ये अरविंद सावंत रत्नागिरी, समीर थोरात सातारा, मनोज ठाकूर, वक्केश राऊत व माणिक वोतोंडे पालघर यांचाही समावेश होता. 

    खा. नीलेश लंके यांनी सांगितले की, नगर जिल्हयातून आपला व सच्छिदानंद भोसले यांचा दाखल करण्यात आलेला अर्ज बाद करण्यामागे मोठे षडयंत्र आहे. स्पोर्टस कोड २०११ आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नामांकन करताना धर्मदाय आयुक्त यांचे रेकॉर्ड सादर करण्याचे बंधन नाही. स्पोर्टस कोडनुसार अध्यक्ष आणि सचिव यांनी पाठविलेली नावे ग्राहय धरली जातात. जेंव्हा प्रतिनिधी नामांकन करतात कार्यकारणी ठराव महत्वपूर्ण असतो. त्यात बदल अर्ज एक वर्षातत कधीही दाखल केला जाऊ शकतो.ही एक औपचारीकता असते, कायदा नाही. कार्यकारणी किंवा सर्वसाधारण सभेचा ठराव महत्वाचा असतो. आमच्या संघटनेची निवडणूक २०२२ मध्ये झाली असताना आम्ही बदल अर्ज कसा केलेला नसेल ? असा सवाल खा. लंके यांनी केला.


राज्य कबड्डीच्या निवडणुकीला स्थगिती 

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या २१ जुलैला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. 

या निवडणुकीला स्थगिती मिळावी व क्रीडा संहितेचे पालन व्हावे म्हणून खासदार नीलेश लंके व सच्चिदानंद भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, कार्यकारी समितीची वयोमर्यादा, कार्यकाल मर्यादा व मतदानाच्या हक्काबाबत क्रीडा संहितेचे पालन होत नसल्याबाबत सातारा जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दोन्ही संघटनांच्या याचिकेवर गुरुवारी (ता.१८) सुनावणी होणार होती; परंतु उच्च न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवारी (ता.१९) होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी व सातारा जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या याचिकेचे समर्थन करून राज्य कबड्डी असोसिएशनची होणाऱ्या निवडणुकीस स्थगिती दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post