माय नगर वेब टीम
मुंबई : पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी पत्रकार संदिप जाधव यांची निवड झाली आहे. लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य यांच्या हस्ते त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्यभरात लोकशाही पत्रकार संघामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. पत्रकारांना विमा कवच, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण, घर, नवे तंत्रज्ञान कौशल्य, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन या प्रश्नांकडे लोकशाही पत्रकार संघाने लक्ष केंद्रित केले असल्याने राज्यभरातील
पत्रकारांचा देखील मोठा प्रतिसाद लोकशाही पत्रकार संघाला मिळत आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असूनही तो अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, त्याच्या संरक्षणाचा प्रश्न मागे पडला आहे, तो लोकशाहीचा महत्वाचा घटक असूनही निराधार असल्याचे परखड मत निवडीनंतर पत्रकार संदिप जाधव यांनी व्यक्त केले आहे.
यासोबतच डिजिटल मीडिया’ला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात घेतले जात नाही. ‘डिजिटल मीडिया’चे काम करणाऱ्या पत्रकारांन त्यांचे अधिकार मिळत नाहीत.
‘डिजिटल मीडिया’तल्या सर्व पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे यासाठी भविष्यात आमची लढाई असेल. अस जाधव यांनी सांगितले. ऑनलाईन क्षेत्रात काम करत असलेल्या पत्रकारांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्यात काम करणार असल्याचं सांगत जाधव यांनी या राज्यपातळीवरील महत्त्वाच्या पदावर निवड करत काम करण्याची संधी दिली म्हणून अध्यक्ष भागवत वैद्य व लोकशाही पत्रकार संघाच्या सर्व टीमचेही आभार मानले. एकंदरीत या निवडीनंतर पत्रकार संदिप जाधव यांच्यावर विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment