अजय बारस्कर धमकी प्रकरण; महाराज उपोषणाच्या तयारीत

 


माय नगर वेब टीम 
अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे अजय बारस्कर यांना अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या धमकीबाबत त्यांनी आज अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी जी भूमिका मांडली तेव्हापासून आजपर्यंत अज्ञात इसमांकडून धमक्या येत असल्याचं बारस्कर यांनी म्हटलंय. दरम्यान, आपण लवकरच मराठवाड्यात जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा देखील बारस्कर यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे जे कायदेशीर सल्लागार आहेत, त्यांनी माझ्यासमोर येऊन खुली चर्चा करावी, असा आव्हान त्यांनी जरांगे यांना दिले आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं कोट्यवधी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणापत्र मिळाले असल्याचे जरांगे सांगतात, पण ते खोटं आहे असा दावा देखील बारस्कर यांनी केलाय.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post