खा. नीलेश लंके यांचा एस.टी. प्रवास अन् प्रवाशांना सुखद धक्का!



नगर ते तिसगांव प्रवासात जाणून घेतल्या समस्या

खा. लंके यांच्यासारखाच खासदार हवा, प्रवाशांच्या प्रतिक्रिया

माय नगर वेब टीम 

अहमदनगर :  खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी नगर ते तिसगांव या  मार्गावर एसटीने प्रवास करीत  बसमधील प्रवाशांना आश्‍चर्याचा धक्का दिला. प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. नीलेश लंके यांच्यासारखाच खासदार हवा  अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या. 

      पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार खा. लंके हे तिसगांव येथे जाणार  होते. स्वतंत्र वाहनातून जाण्याऐवजी त्यांनी एसटी ने प्रवास करण्याचा निर्णय  घेतला. नगरच्या बस स्थानकावर येऊन ते तिसगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. बसमधील  विविध प्रवाशांची त्यांनी संवाद साधला. त्यांच्याकडे काही महिलांनी समस्या मांडल्या. त्याबाबत आपल्या संपर्क कार्यालयाकडे  कागदपत्रे पाठविण्याचा सल्ला देत तुमच्या समस्या दुर करण्यासाठी मी पाठपुरावा करतो अशी ग्वाही त्यांनी दिली. 

      या मार्गावर प्रवास करणाऱ्या तरूणांशी त्यांनी संवाद साधला. त्यांना येणाऱ्या  अडचणी समजुन घेत त्यावर नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचीही त्यांच्याकडे विचारणा करून तरूण मित्रांची कामे मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली. 

    प्रवासादरम्यान अनेकांनी खा. लंके यांच्यासमवेत सेल्फी काढल्या. काही तरूणांनी व्हिडीओ कॉल  करीत लंके यांच्याशी इतर मित्रांचा संवाद घडवून आणला. आमचा लोकप्रतिनिधी आमच्यासोबत प्रवास करतो आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्हाला असाच खासदार हवा अशी  प्रतिक्रिया देत प्रवाशांनी खा. लंके यांच्याशी संवाद साधताना कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची आठवण  करून दिली. कोरोना संकटात  हजारो रूग्णांची लंके यांनी  केलेली सेवा आम्ही दुरचित्रवाणीवरून पाहिली याचीही आठवण एका  आजीबाईने करून दिली.

सर्वसामान्यांसाठी जीवन समर्पित 

मी सामान्य कुटूंबातील असल्याने लहानपणीपासून एसटी बसनेच प्रवास केलेला आहे. आज मी खासदार असलो तरी सामान्यच आहे. त्यामुळे बसने प्रवास करणे काही वेगळी गोष्ट नाही. मी सर्वसामान्यांच्या वेदना जाणतो. याच सामान्यांसाठी मी ३६५  दिवस २४ तास कार्यरत असतो.सामान्यांसाठीच माझे जीवन समर्पित आहे.

नीलेश लंके 

खासदार

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post