नगर तालुक्यात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार



माय नगर वेब टीम 

अहमदनगर - नगर तालुक्यात प्रथमच सलग दुसऱ्या वर्षी भोरवाडी येथे शनिवारी (दि.२०) नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यत पार पडल्या. सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेला हा चित्तथरारक शर्यतींचा थरार तब्बल १० तास रंगला. या शर्यती साठी गाडाअ मालकांनी सुमारे ७५० बैल आणि २०० घोडे आणण्यात आले होते. दिवस भरात जिल्ह्यातील हजारो प्रेक्षकांनी या शर्यती पाहण्यासाठी भोरवाडी येथे हजेरी लावली.


न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने आता राज्यात व देशभरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. मात्र नगर तालुक्यात इतिहासात प्रथमच गतवर्षी बैलगाडा शर्यतीचे आयोजन भोरवाडी येथील श्री.हनुमान सप्ताह यात्रा उत्सवानिमित्त ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक राहुल जाधव युवा मंच च्या वतीने करण्यात आले होते.नगर तालुक्यात प्रथमच भोरवाडी येथे आयोजित केलेल्या या बैलगाडा शर्यती बाबत मोठी उत्सुकता होती. त्यामुळे गतवर्षी दिवसभरात या शर्यती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक आले होते.


या वर्षीही शनिवारी नगर तालुका केसरी बैलगाडा शर्यती झाल्या. या मध्ये प्रथम बक्षीस गिरीश वाखारे, द्वितीय बक्षीस अक्षय जाधव (रुबाब कलेक्शन, नगर), तृतीय बक्षीस साहेबराव शेळके (पिंपरी जलसेन, पारनेर), घाटाच आकर्षण  दहशत किंग रामा (विजय लोमटे), घाटाचा राजा शंकर बबन शेळके यांनी बक्षिसे मिळविली. या विजेत्यांना फ्रीज, एलईडी टीव्ही, कुलर या वस्तूंसह रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली.


या शर्यती पाहण्यासाठी भोरवाडी गावचे सरपंच भास्कर भोर, उपसरपंच सुरेश जासूद,माजी सरपंच नवनाथ वायळ, दिपक भोर, उद्योजक राजु भोर, चेअरमन दादा ठाणगे सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जि. प. बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, माजी नगरसेवक मनोज कोतकर, संभाजी पवार यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, सर्व ग्रामस्थ व उपस्थित होते. दिवसभरात ७ ते ८ हजार बैलगाडा शौकीनांनी हजेरी लावली. 


 दिवसभर चाललेल्या या शर्यतींच्या नियोजनासाठी राहुल जाधव यांच्यासह युवामंच चे अध्यक्ष विजय लोमटे, उपाध्यक्ष अक्षय पानसरे सचिव प्रतिक भोर आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post