*तात्काळ 150 धारकांना मिळणार रेशन कार्ड व पंधरा दिवसात रेशनकार्ड ऑनलाईन प्रक्रीया करणार पुर्ण !*
माय नगर वेब टीम
पारनेर : गेली काही दिवसापासून पारनेर तालुक्यातील सामान्य जनतेच्या तहसील कार्यालयात असणाऱ्या विविध समस्या व अडचणीच्या संदर्भात व महसूल प्रशासन ,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झालेले अनेक लाभार्थी वारंवार तहसील कार्यालयात हेलपाटे घालत होते .व त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत होती . खासदार निलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयात यापूर्वी अनेक तक्रारीही आल्या होत्या.परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित राहत होते .त्या संदर्भात निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी , सचिन पठारे जितेश सरडे ,रवींद्र राजदेव यांच्या पुढाकारातून यासंदर्भात बुधवारी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आढारी यांना निवेदन दिले होते . व शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या दालनात भव्य ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्याची दखल घेत तहसीलदार सौ.गायत्री सौंदाणे यांनी सदर आक्रमक आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत.त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सायंकाळपर्यंत 150 लाभार्थ्यांना रेशन कार्ड तात्काळ देण्यात येईल व गेल्या अनेक वर्षाचा रेशन कार्ड ऑनलाइनचा प्रलंबित प्रश्न येत्या पंधरा दिवसात सोडवणार असे तहसीलदारांनी आंदोलकांना आश्वासित केले .
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी व पोलीस भरती प्रक्रिया सुरू असल्याने त्यासाठीही विविध कागदपत्रे व दाखल्यांची आवश्यकता आहे.त्याचबरोबर लाडकी बहिण योजनेसाठी महिलांना विविध कागदपत्रांसाठी दाखल्यांची आवश्यकता भासते.या योजनेसाठी रेशनकार्ड महत्वपुर्ण असून रेनशकार्ड दुरूस्ती,दुबार रेशन,नवीन रेशन कार्ड,नाव कमी करणे,नाव समाविष्ट करणे,रेशन कार्ड के.वाय .सी. करणे ,संजय गांधी ,श्रावणबाळ योजने संधर्भात अनागोंदी कारभार यासारख्या कामांना सामान्य नागरीकांना तहसिल कार्यालयामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.रेशनकार्ड संबंधी सामान्य नागरीकांच्या अनेक गंभीर समस्या आहेत.यासंबंधी तहसिल कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीची उत्तरे व सामान्य लाभार्थ्यांना मुजोर वागणुक दिली जात आहे. त्या संधर्भात पारनेर तहसिल कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविषयी सामान्य नागरीकांमध्ये प्रचंड रोष आहे . या सर्व प्रलंबीत व ज्वलंत विषयांचा पाठपुरावा तात्काळ करावा अशी ही आंदोलकांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले .
तहसिल कार्यालयातील प्रलंबित कामांची पुर्णपणे अंबलबजावणी झाली नाही व प्रशासनाने दिलेला शब्द मुदतीत पाळला नाही तर हे सदर नियोजित आंदोलन काही दिवसासाठी तात्पुरते मागे घेतले आहे.परंतु थांबवले नाही आसे सांगत महसूल विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर या ही पेक्षा तिव्र स्वरूपात आंदोलन करणार आसे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी ,सचिन पठारे ,जितेश सरडे ,रविंद्र राजदेव सह प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी महसुल प्रशासनाला सुचित केले .
या वेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी,नांदुर पठारचे मा.सरपंच रविंद्र राजदेव ,जितेश सरडे, भाऊ चौरे ,आप्पा शिंदे ,सरपंच सचिन पठारे ,चंद्रभान ठुबे, भाऊसाहेब भोगाडे,सनवर शेख ,अमित जाधव ,बापू ठुबे ,पोपट गुंड, ॲड.गणेश कावरे ,दत्ता ठाणगे ,किरण जमदाडे ,बाजीराव कारखिले ,प्रकाश गुंड ,संदीप ठाणगे ,पोपट रेपाळे,दत्ता दिवटे,दौलत गांगड ,बाळा करजुले,उमाताई बोऱ्हाडे , मिराताई गोरडे ,लखन ठणगे,शशी कारखिले या सह शेकडो निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हितचिंतक व रेशनकार्ड धारक लाभार्थी उपस्थित होते .
Post a Comment