विधानसभा निवडणूक रणनीतीसाठी प्रदेश काँग्रेसची १९ जुलैला मुंबईत बैठक ; जिल्हाध्यक्ष किरण काळेंची माहिती



प्रभारी चेंनीथला, विधिमंडळ पक्षनेते आ.थोरात, प्रांताध्यक्ष आ. पटोलेंची असणार प्रमुख उपस्थिती 

माय नगर वेब टीम 

: काँग्रेसने राज्यभर विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघां मधील इच्छुकांना १० ऑगस्टपर्यंत शहर जिल्हा व जिल्हा काँग्रेसकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच आता शुक्रवार १९ जुलै रोजी दुपारी दोन वाजता प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन, दादर येथील राज्य कार्यालयात पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. 


याबाबत अधिक माहिती देताना काळे म्हणाले की, राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेसचे मजबूत संघटन आहे. पक्षाने संगमनेर, श्रीरामपूर, राहता यासह नगर शहर, अकोला, कोपरगाव व श्रीगोंदा अशा एकूण सात जागांवर दावा केला आहे. मुंबईत पार पडणाऱ्या बैठकीसाठी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेंनीथला, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 


काळे पुढे म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी संदर्भातील आढावा, आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा, पक्षाचा संघटनात्मक आढावा, मतदार यादी पूर्ननिरीक्षण कार्यक्रमा संदर्भातील आढावा यावेळी श्रेष्ठी घेणार आहेत. बैठकीसाठी जिल्हाध्यक्षां बरोबरच प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्यांचे प्रभारी, राज्यातील विविध आघाडी संघटनांचे प्रमुख यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. 


यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षाचे विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ. सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी मंत्री आरिफ खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांची देखिल उपस्थिती असणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post